नवी दिल्ली : विमानाने प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांना सामान नेण्याबाबत दक्ष राहावे लागणार आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाने हँडबॅगसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या अंतर्गत प्रत्येक विमानामध्ये प्रवासी फक्त एकच हॅण्डबॅग घेऊन जाऊ शकतील. या अगोदर प्रवासी ७ किलो वजनाला दोन हॅण्डबॅगमध्ये विभागून घेऊ जाऊ शकत होते. त्यावर आता निर्बंध घातले गेले आहेत, नव्या नियमांनुसार केवळ एकच बॅग तुम्ही हातात घेऊन जाऊ शकता.
ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) ने सुरक्षा व्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी नवीन हँड बॅगेज नियम आणले आहेत. यानुसार, प्रवासी, मग ते देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये, विमानात एकच केबिन बॅग ठेवू शकतात. कोणतेही अतिरिक्त सामान चेक इन करणे आवश्यक आहे. तुमच्या प्रवासाच्या वर्गानुसार हॅन्डबॅग सामानासाठी वजनाचे निर्बंध बदलतात. इकॉनॉमी आणि प्रीमियम इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांसाठी ७ किलोपर्यंतच्या हँडबॅगला परवानगी आहे आणि प्रथम श्रेणी आणि बिझनेस क्लासमधील प्रवाशांसाठी १० किलोपर्यंतच्या हँडबॅगला परवानगी आहे. सामानाचा आकार ४० सेमी (लांबी), २० सेमी (रुंदी) आणि ५५ सेमी (उंची) पेक्षा जास्त नसावा. विमानतळे अधिक व्यस्त होत असताना, प्रवाशांच्या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि उत्तम सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जात आहेत.
इंटरनेट सेवांचा वापर नियंत्रित होणार
देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी नवीन वाय-फाय नियम भारत सरकारने गेल्या महिन्यात देशांतर्गत उड्डाणांवर इंटरनेट सेवांचा वापर नियंत्रित करणारे नवीन नियम जारी केले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, विमान ३ मीटर किंवा जमिनीपासून सुमारे ९ हजार ८४३ फूट उंचीवर पोहोचेपर्यंतच प्रवाशांना वाय-फाय आणि इतर इंटरनेट सेवा वापरण्याची परवानगी असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्के अधिक प्रवाशांनी विमानाने प्रवास केला.
नोव्हेंबर महिन्यात १२ कोटींची वाढ
नोव्हेंबरमध्ये देशांतर्गत १.४२ कोटी प्रवाशांनी हवाई वाहतूक केली आहे. गेल्यावर्षी याच महिन्याच्या तुलनेत ही १२ टक्क्यांची वाढ आहे. जानेवारी-नोव्हेंबर २०२४ या कालावधीत देशांतर्गत विमान कंपन्यांद्वारे प्रवासी वाहतूक करणा-यांची संख्या १,४६४.०२ लाख होती, जी मागील वर्षी याच कालावधीत १,३८२.३४ लाख होती, ज्यात वार्षिक ५.९१ टक्के आणि ११.९ टक्के मासिक वाढ नोंदवली गेली.