38.6 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeमहाराष्ट्रसत्ताधारी संविधानातील मूल्यांना बाजूला सारतायेत

सत्ताधारी संविधानातील मूल्यांना बाजूला सारतायेत

पुणे : महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करण्यासाठी राज्यातून मंत्री, राजकीय पदाधिकारी येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीसुद्धा फुलेंना अभिवादन करण्यासाठी उपस्थिती लावली आहे. अभिवादन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. संविधानातील समता, सामाजिक न्याय, बंधुता ही मूल्य जी आहे. या सगळ्या मूल्यांना बाजूला सारण्याचाही कुठेतरी सत्ताधा-यांकडून प्रयत्न होत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.

सपकाळ म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांचे भारताच्या समाज व्यवस्थेमध्ये संविधानाच्या निर्माणमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. जी परिवर्तनाची समतेची, बंधुत्वाची, सामाजिक न्यायाची भूमिका आपल्या महान संविधानामध्ये संमेलित झाली. याची ज्योत याची तेवत ठेवण्याचे किंबहुना हस्तांतरित करण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले तथा फुले दाम्पत्यांनी केलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वारसा आणि वसा हा बहुजन समाजालाच नव्हे तर आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. मात्र महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे दोघंही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले. त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोके वर काढलेले आहे.

संविधानातील समता, सामाजिक न्याय, बंधुता ही मूल्य जी आहे. या सगळ्या मूल्यांना बाजूला सारण्याचाही कुठेतरी सत्ताधा-यांकडून प्रयत्न होत आहे आणि आज या निमित्ताने याठिकाणी प्रांताध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व सहका-यांच्या समवेत याठिकाणी येण्याचे विशेष कारण की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो वैचारिक संघर्ष आहे जो वैचारिक मशाल आहे. ती कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही आणि आगामी काळात काँग्रेस ही वैचारिक लढाई लढणार आहे. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो आदर्श आहे. तो आम्हाला शिरसावंद्य आहे. एवढेच आज अभिवादन करत असताना या निमित्तानं आपल्याला सांगावसे वाटत आहे.

पुन्हा संघर्षाची वेळ
महात्मा फुलेंचा जो विचार आहे तो विचार आज पुन्हा एकदा त्या विचाराने संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. आत्ताच याठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितले की पूर्वी तसे होत होते आज होत नाही आणि हे सांगत असताना त्यांनी आज ही जो भेदाभेद होत आहे. ज्या शाळा ज्या आहेत सरकारी शाळा त्या बंद होत आहेत. महिलांवर अत्याचार जे वाढत आहेत. याला मात्र त्यांनी बगल दिली. अत्याचार तेव्हा जे होत होते ते कोणत्या विचारसणीमुळे होत होते. या स्वयंसेवक संघाच्या बंच ऑफ थॉट या पुस्तकांमध्ये या विचारसरणीचा उल्लेख आहे. भाजपसाठी त्यांचे बायबल म्हणजे बंच ऑफ थॉट आहे. महिलांनी शिकू नये हे त्यामध्ये मान्य केलेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR