मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज (२२ जानेवारी) पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याकडे देशासह जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले होते. हा सोहळा संपन्न होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, ‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, आणि शरयू नदी हसली!’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली! जय श्रीराम! अशी पोस्ट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये केली आहे.