नागपूर : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. दरम्यान, या अधिवेशनात एकूण बैठका १० झाल्या असून यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १०१ तास १० मिनिटांचे झाले आहे. रोजचे सरासरी कामकाज १० तास ५ मिनिटे झाले. या अधिवेशनादरम्यान एकूण ७,५८१ प्रश्न विचारण्यात आले होते. यांपैकी स्विकृत प्रश्न २४७ होते तर उत्तर देण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या ३४ होती.
दरम्यान, सदस्यांची उपस्थिती ९३.३३ टक्के तर कमीत कमी उपस्थिती ६४.७३ टक्के एकूण सरासरी उपस्थिती ८१.६९ टक्के नोंदविली गेली. विधानसभेचे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २६ फेब्रुवारी २०२४ रोजी विधानभवन मुंबई येथे होणार आहे.