मानवत : शहरातील श्रीनिधी ट्रॅव्हलस मधून प्रवास करणारा एक प्रवाशी गाडीत पैसे विसरला होता. गाडीची तपासणी करीत असताना चालक सुकुमार कांबळे यांना हे पैसे सापडले होते. त्यांनी या विषयी ट्रॅव्हलसचे मालक केशवळ पिंपळे यांना सांगितले. त्यानंतर पिंपळे यांनी लगेच संबंधीत प्रवाशासी संपर्क साधून त्यांनी प्रवाशाचे ५ हजार रूपये परत केले. चालक कांबळे यांनी अमिषाला बळी न पडता पैसे परत दिल्याने श्रीनिधी ट्रॅव्हल्सच्या मालकाने चालक कांबळे यांचे कौतूक केले आहे.
श्री निधी ट्रॅव्हल्स दि. ३ रोजी परभणी ते पुणे एसी ट्रॅव्हल्स नेहमीप्रमाणे पुण्याला गेली असता दैनिक कामाचा भाग म्हणून गाडीतील ड्रायव्हर कांबळे यांनी ही गाडी तपासली असता त्यांना सीट क्रमांक ३ व ४वर ५ हजार रुपये दिसले. त्यांनी ही बाब तत्काळ श्रीनिधी ट्रॅव्हल्सचे मालक पिंपळे यांना सांगितली. त्यांनी प्रवाशाला संपर्क साधून सदरील रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली.
चालक कांबळे हे पैसे सहजपणे ठेऊ शकले असते. पण त्यांनी या मोहाला बळी न पडता आपल्या प्रामाणिक पणाची प्रचिती देऊन जनमानसात श्रीनिधी ट्रॅव्हल्स विश्वसनीय सेवेचे प्रतीक आहे हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला. श्रीनिधी ट्रॅव्हल्सच्या मालकाने चालक कांबळे यांचे कौतुक केले आहे.