35.9 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा पाणी फाऊंडेशनचे तुफान येणार

राज्यात पुन्हा पाणी फाऊंडेशनचे तुफान येणार

आमिर खानची घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात नव्या उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी
पाणी फाउंडेशनचे काम पुन्हा आम्ही राज्यभर करणार आहोत. पुढच्या वर्षीपासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात हे काम करू, अशी घोषणा अभिनेता आमिर खानने केली आहे. काही मोजक्या गावांमध्ये नाही तर आता राज्यभरातील अनेक गावांमध्ये पाणी फाऊंडेशनचे तुफान पुन्हा येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या उपक्रमाचा शुभारंभ पुण्यात करण्यात आला.

तीन वर्षांपूर्वी एक स्वप्न घेऊन आम्ही पुढे आलो होतो. ते स्वप्न शेतक-यांसाठी होते. शेतक-यांसाठी काय करू शकतो, पीक कसे वाढवता येईल, हे सगळे मुद्दे घेऊन समोर आलो होतो. देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो की ते आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले, म्हणून दरवर्षी आम्ही यशस्वी होत गेलो, असेही ते म्हणाले.

देवेंद्रजी प्रत्येक वर्षी तुम्ही मला एक गोष्ट विचारत की, हे काम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कधी जाणार आहात? पण आम्हाला थोडी भीती वाटते. कारण ही जबाबदारी खूप मोठी आहे. आपला महाराष्ट्र जर्मनीपेक्षा खूप मोठा आहे, अशा स्थितीत आपण राज्यभर पाणी फाउंडेशनचे काम घेऊन जाऊ शकतो का, पण आम्ही आता पाणी फाउंडेशनचे काम राज्यभर करणार आहोत. पुढच्या वर्षीपासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रात हे काम करू, असे सांगताना पाणी फाउंडेशनचे काम आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होणार असल्याचे अभिनेता आमिर खान म्हणाले.

पाणी फाउंडेशन आता संपूर्ण राज्यभर काम करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पुढच्या वर्षीपासून राज्यभरातील अनेक गावांमध्ये पाणी फाउंडेशन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नव्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. शेतक-यांसाठी काय करू शकतो, पीक कसे वाढवता येईल, हे सगळे मुद्दे घेऊन समोर आलो होता. गट शेती करण्याचा प्रयत्न आम्ही केला, असेही आमिर खान म्हणाले.

पाणी फाऊंडेशनच्या कामाची व्याप्ती वाढणार
आमीर खानने त्याच्या सत्यमेव जयतेमार्फत दुष्काळाचे आव्हान पेलण्याचे ठरवले. काही वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनची स्थापना केली गेली. सत्यमेव जयतेच्या वैशिष्ट्याप्रमाणे दुष्काळी भागात फिरून उपलब्ध जलसाठे, पावसाचे प्रमाण इत्यादी आवश्यक माहिती गोळा केली. त्यानंतर दुष्काळाला हरवण्याचा प्लान बनवण्यात आला. महाराष्ट्रातील विशेषत: मराठवाड्यातील काही गावांमध्ये पाणी फाऊंडेशनचे काम झाले. आता महाराष्ट्रभर पाणी फाऊंडेशन काम करणार असल्याचे आमिर खानने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR