27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीय‘कावड यात्रा’ मार्गात दुकानदारांची ‘नेमप्लेट’ लावण्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

‘कावड यात्रा’ मार्गात दुकानदारांची ‘नेमप्लेट’ लावण्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

युपी, एमपी सरकारला पाठवली नोटीस

नवी दिल्ली :‘कावड यात्रा’ मार्गातील खाद्यपदार्थांच्या दुकानावर मालकांच्या नावाचे फलक लावण्याचा फतवा उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने काढला होता. याला आता सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. तसंच हा निर्णय घेणा-या सरकारांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली आहे.

कावड यात्रा मार्गातील नेमप्लेटविरोधात दाखल याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडच्या सरकारांना निर्देश दिले की, ‘कावड मार्गातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना, मालकांना तसेच कर्मचारी दुकानावर त्यांची नावे देण्याची सक्ती करू नये’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR