22.5 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeसोलापूरसर्व्हेअरला ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सर्व्हेअरला ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

गंगाखेड: पंतप्रधान नागरी आवास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचे हप्ते टाकण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी करणा-या खाजगी संस्थेच्या सर्व्हेअरला दि. ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. या कार्यवाहीने नगर परिषद कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड शहरातील एका लाभार्थ्यास पंतप्रधान नागरी आवास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल बांधकामासाठी नगर परिषद प्रशासनाकडून पहिला हप्ता देण्यात आला. या घरकुलाचे उर्वरित हप्ते टाकण्यासाठी खाजगी संस्थेमार्फत नगर परिषदेत पंतप्रधान नागरी आवास योजना घरकुल सर्व्हेअरचे काम करणा-या सरफराज सरदार पठाण रा. बनवाडी ता. सोनपेठ याने ५ हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून पैशांची मागणी केली.

तेंव्हा घरकुल लाभार्थी यांनी दि. २९ जानेवारी रोजी याबाबत परभणी येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिल्याने दि. ३० जानेवारी रोजी परभणी लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर, पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे, पोलीस हवालदार चंद्रशेखर निलपत्रेवार, जनार्धन कदम, पोलीस शिपाई शेख जिब्राइल, अतुल कदम आदींनी दि. ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास डॉक्टर लाईन स्थित खाजगी कार्यालय परिसरात सापळा लावून तक्रारदार याच्याकडून ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना सरफराज पठाण यास ताब्यात घेत गंगाखेड नगर परिषद कार्यालयातील अभियंत्याच्या कक्षातील अलमारीस सिल ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सदर कर्मचा-याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR