जीनिव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाला ग्लोबल हेल्थ इमर्जन्सीच्या यादीतून काढून टाकले असले, तरी जागतिक स्तरावर अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. यूके-अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्याचा धोका अजूनही दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांत, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे, रुग्णालयांमध्ये गर्दी आणि आरोग्याला असलेला धोकाही वाढताना दिसत आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसध्ये सतत म्यूटेशन होत आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये संशोधकांच्या टीमने कोरोनाचे दोन नवीन व्हेरिएंट समोर आल्याची माहिती दिली आहे.
रिपोर्टनुसार, अमेरिकेत कोरोनाचे दोन नवीन व्हेरिएंट आढळून आले आहेत, जे कोरोना व्हायरस स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी सतत म्यूटेशन करत असल्याचा संकेत आहे. हा जागतिक आरोग्यासाठी एक मोठा धोका असू शकतो. नेचर जर्नलमध्ये या आठवड्यात प्रकाशित झालेल्या नवीन लॅब रिपोर्टमध्ये असे नमूद केले आहे की ओमायक्रॉनच्या बीए.२.८६ व्हेरिएंटमध्ये नवीन म्यूटेशन आढळून आले आहे, ज्याने कोरोना, जेएन.१ बद्दल माहिती दिली. ४० हून अधिक नवीन म्यूटेशनसह, जेएन.१ नावाच्या नवीन व्हेरिएंटची पुष्टी फ्रान्स, पोर्तुगाल, युनायटेडकिंगडम आणि युनायटेड स्टेट्ससह इतर अनेक देशांमध्ये झाली आहे.
अर्कांसस स्टेट युनिव्हर्सिटीच्या न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे व्हायरस ट्रॅकर डॉ. राजेंद्रम राजनारायणन म्हणतात, व्हायरस विकसित होत आहे. आम्ही सध्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की नवीन व्हेरिएंटमुळे संसर्गाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता किती आहे किंवा रोगप्रतिकारक शक्तीवर त्याची प्रतिक्रिया कशी असेल?
भविष्यात संकटे येणार
कोरोना अजूनही पूर्णपणे नष्ट झालेला नाही, त्यामुळे त्याच्या प्रतिबंधाबाबत आपण सदैव सतर्क राहणे आवश्यक आहे. भविष्यात नवीन व्हेरिएंट उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. फ्रेड हचिन्सन कॅन्सर सेंटरमधील प्राध्यापक जेसी ब्लूम यांच्या मते, ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरिएंटमध्ये इम्यून स्केपची क्षमता अधिक असल्याचे दिसून येते. ओमायक्रॉनचे आतापर्यंतचे स्वरूप पाहता, असे म्हणता येईल की नवीन म्यूटेड व्हेरिएंटबद्दस फार टेन्शन घेण्याची गरज नाही. मात्र योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.