28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजन‘ऍनिमल’चा टिझर झळकला बुर्ज खलिफावर

‘ऍनिमल’चा टिझर झळकला बुर्ज खलिफावर

मुंबई : रणबीर कपूरच्या ऍनिमल सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ऍनिमल सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणबीर कपूर – रश्मिका मंदाना – बॉबी देओल अशा कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. ऍनिमल सिनेमाला एक खास सन्मान मिळालाय. तो म्हणजे ऍनिमलचा सिनेमा थेट बुर्ज खलिफावर झळकला.

ऍनिमलच्या निर्मात्यांनी सिनेमाचा टीझर चित्रपटाच्या रिलीजपूर्वी संपूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बुर्ज खलिफावरील ऍनिमलचा खास ट्रेलर दाखवला जात आहे. यावेळी रणबीर कपूरसोबत बॉबी देओल आणि भूषण कुमारही दिसत आहेत.

रणबीर, बॉबी आणि निर्माते भूषण कुमार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हे तिघे गगनचुंबी इमारत बुर्ज खलिफावर झळकलेला चित्रपटाचा ट्रेलर पाहत आहेत. रणबीर हा क्षण आपल्या मोबाईल कॅमे-यात कैद करताना दिसत आहे. यावेळी रणबीरच्या चेह-यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्याने चाहत्यांसोबत सेल्फीही काढले. बुर्ज खलिफावर चित्रपटाचा ६० सेकंदाचा खास ट्रेलर व्हिडिओ दाखवण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR