21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रविशाळगडावर दहशतवादी राहून गेला

विशाळगडावर दहशतवादी राहून गेला

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर काल विशाळगड परिसरात मोठी दगडफेक झाली. यानंतर आता शाहुवाडी पोलिसांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

यानंतर सोमवारी संभीजीराजे यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावर भूमिका स्पष्ट केली. यासह त्यांनी खळबळजनक दावा करत दहशतवादी यासिन भटकळ तब्बल ६ दिवस विशाळगडावर राहून गेला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे म्हणाले गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटावे ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. हा विषय मी जरा उशीरा हाती घेतला आहे. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रम झाले आहे. इथे उघड्यावर कोंबड्या कापल्या जात आहेत. इथले स्थानिक आमदार हे या सरकारसोबत आहेत त्यांनी या अतिक्रमणला खातपानी घातले आहे. एकही नेता गडकोट विषयी बोलत नाही. सर्वजण मलाच त्रास देत आहेत. पुढे बोलताना संभीजीराजे यांनी यांनी एक खळबळजन आरोप केला आहे. ते म्हणाले की, यासिन भटकळ हा कुख्यात दहशतवादी विशाळगडावर सहा दिवस राहून गेला आहे. दरम्यान आता संभाजीराजे यांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोण आहे यासिन भटकळ?
इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य यासीन भटकळ याचा जन्म १९८३ मध्ये कर्नाटकातील भटकळ या गावात झाला. यासिनला मोहम्मद अहमद सिद्धिबाप्पा या नावानेही ओळखले जाते. १२राज्यांच्या दहशतवादविरोधी एजन्सीच्या आरोपपत्रानुसार भटकळचा जर्मन बेकरीसह देशभरात किमान १० दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग आहे. दिल्लीच्या बाजारपेठेतील साखळी बॉम्बस्फोटांचाही तो मास्टरमाईंड होता. मुंबई लोकल, बंंगळुरू, जयपूर, वाराणसी, सुरत येथे झालेल्या बॉम्बस्फोटातीलही तो आरोपी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR