भिवंडी : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हीडीओ व्हायरल होत असतात. परंतु ठाण्यातील भिवंडीचा दोन परिवारातील हाणामारीचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमध्ये दोन परिवार आपआपसात भिडले आहे. त्यांची हाणामारी सुरु असताना जे झाले त्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. दोन परिवाराच्या मारहाणीत तिस-या व्यक्तीचे नुकसान झाले आहे. त्याचे छप्परच पडले आहे.
भिवंडी शहरातील दिवानशाह परिसरातील देऊनगर येथे किरकोळ वादातून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्या हाणामारीत अख्खे कुटुंब पत्र्याचे छतावर आले. त्यावेळी ते छत तुटून सर्वजण खाली घरात कोसळले. मोबाईलवर झालेल्या शिविगाळीच्या वादातून हा संघर्ष झाला होते. त्यामुळे तिस-या व्यक्तीचे मोठे नुकसान झाले.
मोइनुद्दीन नसरुद्दीन शेख आणि नसरुद्दीन इमामुद्दीन शेख या कुटुंबांमध्ये मोबाईलवर सुरू झालेला वाद शिविगाळीपर्यंत गेला. त्यानंतर वाद अधिकच तीव्र होत गेला. दोन्ही कुटुंबातील सदस्य इमारतीवरून शेजारील घराच्या पत्राच्या छतावर चढले. यावेळी जोरदार हाणामारी सुरू झाली. या झटापटीत आठ ते दहा महिला व पुरुष सहभागी होते. वाद उफाळल्यानंतर पत्र्याचे छत अचानक कोसळले. ज्यामुळे अख्खे कुटुंब खालील घरात पडले. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र घरमालकाच्या घराचे आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर दोन्ही कुटुंबाने मिळून त्या तिस-या व्यक्तीचे नुकसान भरुन दिल्याचे सांगितले जात आहे.