23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजगावर तिस-या महायुध्दाचे सावट?

जगावर तिस-या महायुध्दाचे सावट?

रशियाच्या संसदेतील खासदाराचे धक्कादायक विधान

मॉस्को : दोन वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला होता. गेल्या दोन वर्षांपासून युक्रेनने रशियाला कडवी झुंज दिली. त्यानंतर आता पहिल्यांदाच युक्रेनने रशियाच्या कुर्स्क प्रदेशात शिरकाव केला आहे. ६ ऑगस्टपासून युक्रेनने आघाडी घेतली असून रशियन सैन्याला मागे सारले आहे. त्यामुळे रशियाला या भागातून दोन लाखांहून अधिक नागरिकांना बाहेर काढावे लागले आहे. यानंतर आता रशियाचे खासदार मिखाईल शेरेमेट यांनी जग तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले असल्याचे मोठे विधान केले आहे.

युक्रेनने पाश्चिमात्य देशांच्या पांिठब्यावर रशियात घुसखोरी केली असून यामुळे जगात आता तिस-या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे, असे विधान शेरेमेट यांनी केले. खासदार शेरेमेट हे रशियाच्या संरक्षण समितीचे सदस्य आहेत. युक्रेनला पाश्चिमात्य देशातील लष्कर आणि लष्करी उपकरणांची साथ मिळाली आहे. त्या मदतीवरच रशियाच्या मातीत पाऊल ठेवण्याचे धाडस त्यांनी ठेवले आहे. या कृतीमुळे आता जगावर नवे संकट ओढविण्याची शक्यता आहे, असे शेरेमेट म्हणाले.

युक्रेनकडे पाश्चिमात्य देशातील शस्त्रास्त्र
रशियातील आरआयए या वृत्तसंस्थेने मिखाईल शेरेमेट यांच्या वक्तव्याचे वृत्त दिले आहे. ते म्हणाले, युक्रेनकडे पाश्चिमात्य देशातील शस्त्रास्त्र आहेत. त्याचा वापर रशियन भूमीत केला गेला आहे. नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले चढवले गेले. पाश्चात्य देशांचे क्षेपणास्त्र रशियावर डागण्यात आले. रशियन भूमीवर केल्या गेलेल्या हल्ल्यात पाश्चात्य देशांचा सहभाग नाकारता येत नाही. त्यामुळे जग आता तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे असा निष्कर्ष काढता येऊ शकतो.रशियाचा नाटोवर आरोप
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांचे जवळचे सहकारी निकोलाई पात्रुशेव्ह यांनीही या परिस्थितीवर गंभीरचिंता व्यक्त केली. रशियातील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हटले की, युक्रेनच्या घुसखोरीमागे नाटो आणि पाश्चिमात्य देशातील गुप्तचर यंत्रणाचा हात आहे. त्यांच्या या दाव्याबाबत त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नसला तरी पाश्चिमात्य देशांच्या हस्तक्षेपावर रशियाची नाराजी यातून स्पष्ट होत आहे.

कुर्स्क प्रदेशात युक्रेनची घुसखोरी
युक्रेनने रशियाच्या कुर्स्क प्रदेशात चढाई करून दुर्स­या महायुद्धानंतरचा रशियन भूमीवरील सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनच्या सैन्याने सुडझा नावाच्या शहरातील १,१५० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र आणि ८२ नागरी वसाहतींवर ताबा मिळविल्याचा दावा करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR