24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeधाराशिवगर्लफ्रेंडला बोलल्याच्या कारणावरून तीघांची तरूणाला मारहाण

गर्लफ्रेंडला बोलल्याच्या कारणावरून तीघांची तरूणाला मारहाण

धाराशिव : प्रतिनिधी
गर्लफ्रेंडला बोलल्याच्या कारणावरून तीघांनी एका तरूणाला फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही मारहाणीची घटना ८ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धाराशिव येथील एमआयडीसी परिसरात वीर शिवा काशीद चौकात घडली. या प्रकरणी जखमी झालेल्या तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाणे येथे तीघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील यशराज सुर्यवंशी, रोहन रायबान, रोहीत जाधव या तीघांनी दि. ८ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पार्थ संतोष गोरे (वय १८) या तरूणाला मारहाण केली. एमआयडीसी मधील आरटीओ ऑफीसकउे जाणा-या रोडवर विर शिवा काशीद चौकात गर्लफे्रंडला बोलल्याच्या कारणावरून या तीघांनी पार्थ गोरे याला लाथाबुक्यांनी, फायटरने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पार्थ गोरे यांनी दि. ८ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR