22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeपरभणीचारठाणा पुलावरून ट्रक खाली कोसळला

चारठाणा पुलावरून ट्रक खाली कोसळला

चारठाणा : प्रतिनिधी
चारठाणा येथून हाकेच्या अंतरावर जिंतूर-जालना महामार्गावरील चारठाणा पुलावरून ट्रक आशरला पाठीमागून धडकून पुलाखाली तीस-पस्तीस फूट कोसळून झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी(दि.१७) पहाटे चार साडेचार दरम्यान घटना घडली दरम्यान ट्रकचा कॅबिन तोडून चालकाला बाहेर काढण्यात आले असून यामध्ये चालकाचे दोन्ही पाय फॅक्चर झाले तर त्यांचा सहकारी देखील गंभीर जखमी झाला असून व आयशर चालकाच्या डोक्या सही गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती चारठाणा येथील किसानप्रसाद खाडे यांनी चारठाणा पोलिसांना माहिती दिल्यानंतर चारठाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड व माणिक कुलकर्णी‌.पो.कॉ.रमेश गिराम,व चारठाणा येथील नागरिक शेख गफार व हिंगोली येथून संभाजीनगरला जात असताना सैन्य दलातील जवान फिरदोस खान पठाण यांच्यासह नागरिकांनी मदत कार्य करून जखमींना बाहेर काढले हा ट्रक धुळे येथून वर्धा येथे जात होता चारठाणा येथीन रुग्णवाहिका चालक इसाकोद्दीन काझी यांनी जखमीला जिंतूर येथे हलविले आहे.

सैन्य दलातील जवानाची घटनास्थळी मदत
अपघात घडल्यानंतर हिंगोली येथील सैन्य दलातील कॅप्टन व त्यांचे सहकारी छत्रपती संभाजीनगर येथे काही कामानिमित्त जात होते अपघात घडल्याचे त्यांच्या नजरेस पडले दरम्यान सैन्यदलाचे प्रमुख तुकाराम मुकाडे व त्यांचे सहकारी सैन्य दलातील जवान फिरदोस का पठाण यांनी ट्रकच्या दिशेने धाव घेऊन ट्रक मध्ये अडकलेल्या दोघांना स्थानिक पोलीस व नागरिकाच्या मदतीने बाहेर काढले विशेष म्हणजे सैन्य दलाचे जवान फिरदोस खान पठाण हे हिंगोली येथील एका अकादमी गरीब विद्यार्थ्यांना पोलीस व सैन्यदलाची मोफत ट्रेनिंग देण्याचे काम करीत आहेत काही कामानिमित्त ते हिंगोली येथून छत्रपती संभाजीनगर जात होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR