धाराशिव : प्रतिनिधी
येथे काही वेळात उध्दव ठाकरे यांची सभा सुरु होण्यापूर्वी खासदार ओम राजे निंबाळकर यांचे काका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उमरगा तालुक्यातील नेते बाबा पाटील हे ठाकरे शिवसेनेच्या धाराशिव येथील व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळे खासदार ओमराजे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
यापूर्वीच खासदार यांचे चुलत बंधू शिवसेना सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांनी ठाकरे सेनेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता काकानेही साथ सोडल्यामुळे खासदारांची अडचण वाढल्याची शिवसैनिकात चर्चा सुरु होती.
















