22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्र्यांच्या बंगल्यांची पाणीपट्टी थकली

मंत्र्यांच्या बंगल्यांची पाणीपट्टी थकली

 मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सह्याद्री अतिथीगृहाचाही समावेश

मुंबई – राज्याचा कारभार पाहणा-या मंत्र्यांच्याच बंगल्यांची पाणीपट्टी थकल्याची बाब समोर आली आहे. तब्बल ९५ लाख १२ हजार रुपयांची ही पाणीपट्टी थकली असून मंत्र्यांच्या बैठका जिथे पार पडतात, त्या सह्याद्री अतिथीगृहाची ३५ लाख ९९ हजार रुपयांची पाणीपट्टी थकली आहे.

मुंबई महापालिकेकडून माहिती अधिकारात ही माहिती मिळाली असून आयटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी ही माहिती मागवली होती. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार थकबाकीदारांमध्ये मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’, ‘नंदनवन’बरोबरच उपमुख्यमंत्र्यांच्या ‘सागर’, ‘मेघदूत’ व ‘देवगिरी’ आणि अनेक मंत्र्यांच्या बंगल्यांचीही पाणीपट्टी थकली आहे.

निधीची तरतूद आधीच केली असून, धनादेश तयार आहेत, त्यामुळे ही थकबाकी त्वरित भरली जाईल, असे बांधकाम विभागाने सांगितले असले तरी थकबाकी एवढी झालीच कशी, याचे उत्तर काही मिळत नाही.

९५ लाखांची वसुली करणार कधी?
२०२१ पासून डिसेंबर २०२३ पर्यंत या सर्व बंगल्यांवरील पाण्याची एकूण थकबाकी ९५ लाख १२ हजार २३६ रुपये असून ही रक्कम मुंबई महानगरपालिकेने वसूल केलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही पाणीपट्टी भरली जाते. याबाबत एका अधिका-यांशी संपर्क साधला असता ही थकबाकी तातडीने भरली जाईल, असे सांगण्यात आले.

बंगले थकबाकी
मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ व ‘नंदनवन’ १८,४८,३५७
उपमुख्यमंत्री फडणवीस (मेघदूत, सागर) २,७३,११८
वित्तमंत्री अजित पवार (देवगिरी) ४,३८,८५९
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी) ६,५२,४९४
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (रॉयलस्टोन) ९२,४२३
आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित (चित्रकूट) ५,१९,१४०
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (सेवासदन) १,५६,५२८
पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (जेतवन) १,१८,३२४
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (रामटेक) ११,३०,२४२
उदय सामंत (मुक्तागिरी) ६,८३,६३२
सह्याद्री अतिथीगृह ३५,९९, ११९

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR