27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रशिरसाटांची संपत्ती १३ पटींनी वाढली

शिरसाटांची संपत्ती १३ पटींनी वाढली

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे बिगुल वाजले आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

संजय शिरसाट यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. संजय शिरसाट यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत १३ पटींनी वाढ झाली आहे.

तर छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपने मंत्री अतुल सावे यांच्यावर तिस-यांदा विश्वास दाखवला आहे.अतुल सावे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अतुल सावे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. यानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत १७ कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR