27.1 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeसोलापूररागाच्या भरात पत्नीने केला पतीचा खून

रागाच्या भरात पत्नीने केला पतीचा खून

सोलापूर : पंधरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून झालेला वाद विकोपास गेला. त्यातूनच रागाच्या भरात पत्नीने पतीचा डोक्यात लाकडाने प्रहार करून खून केल्याची घटना दक्षिण सोलापूरात घडली. पतीचा खून केल्यानंतर पत्नीने स्वतः पोलिसांना मोबाईलद्वारे घटनेची माहिती कळविली. पोलिसांनी तिला अटक केली आहे.

धुळाप्पा नंदकुमार हेले असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी प्रगती हिच्या विरूद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे राहत्या घरात ही घटना घडली.

मृत धूळप्पा हा मालवाहतुकीच्या व्यवसायात वाहनचालक म्हणून काम करायचा. पंधरा वर्षांपूर्वी त्याचे प्रगतीबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना १२ वर्षांची आणि ७ वर्षांची दोन मुली आहेत. तथापि, धुळाप्पा आणि प्रगती यांच्यात अलीकडे घरगुती कारणांवरून भांडणतंटे होऊ लागले. त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यातून प्रगती खूप संतापली होती.

नातेवाईकांकडील लग्न सोहळ्यासाठी धुळाप्पाची आई गेली असताना पुन्हा झालेल्या भांडणाच्यावेळी प्रगतीच्या माहेरची मंडळी धुळाप्पाच्या घरी आली होती. त्यानंतर प्रगतीने धुळाप्पाच्या डोक्यात लाकडाने प्रहार केला. तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR