27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeनांदेडकिनवटच्या भाजी मार्केटमध्ये पत्नीला जीवंत पेटविले

किनवटच्या भाजी मार्केटमध्ये पत्नीला जीवंत पेटविले

नांदेड : किनवट शहरालगतच्या गोकुंदा परिसरातील दत्तनगरातील एकाने स्वत:च्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना शनिवार दि. ११ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

दत्तनगर गोकुंदा येथील रहिवाशी असलेली ३५ वर्षीय महिला शनिवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान गोकुंदा येथून भाजीपाला खरेदीसाठी किनवट पालिकेच्या भाजी मार्केटमध्ये आली होती. भाजीपाला, मसाले व अन्य दुकानांनी गजबजलेल्या मार्केटमधून ती महिला भाजीपाला घेवून घराकडे परतत असताना तिच्या मागावर असलेला तिचा पती अर्जुन सातपुते हा सोनपापडीच्या डब्यात पेट्रोल घेऊन आला आणि त्याने भर बाजारातच पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत ती महिला गंभीररित्या भाजली आहे.

प्रसंगावधान दाखवत व्यापा-यांनी पाणी ओतून महिलेला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आरोपी अर्जुन फरार झाला. व्यापारी व नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर ब-याच वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने पोलिस वाहनातून सदर महिलेला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. भाजलेल्या महिलेस ३ अपत्य असल्याचे सांगण्यात आले. किनवटचे डीवायएसपी रामकृष्ण मळघणे यांच्या टीमने परिश्रम घेत आरोपी अर्जुन सातपुते याला जेरबंद केले. रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी किनवट येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR