पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजार झाला आहे. या आजारामुळे आपल्याला सलग दोन मिनिटेही बोलत येत नसल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा आजार म्हणजे तोडांवरून वारे जाणे होय.
सुषमा अंधारे यांनी हा आजार अत्याधिक मानसिक तणावामुळे होत असल्याचा दावा केला आहे. धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावरून बेल्स पाल्सी या विकाराने ग्रस्त असल्याचे कळवले आहे. हा विकार म्हणजे मराठीतून सोप्या भाषेत अर्ध्या चेह-यावरून वारे जाणे. याने चेह-याच्या स्रायूंमध्ये बदल जाणवतात ज्यामुळे अचानक चेह-याच्या काही भागांमध्ये फडफड किंवा थरथर जाणवायला लागते. सलग दोन मिनिटे बोलणे सुद्धा रुग्णाला अशक्य होते. अत्याधिक मानसिक तणावामुळे हा विकार उद्भवू शकतो. थोडक्यात, राजकारण जीवघेणे असते, असे त्या म्हणाल्यात.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे अडचणीत सापडलेले मंत्री राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी बेल्स पाल्सी विषयी माहिती देताना सांगितले की, माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.