28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeपरभणीआप जिल्हाध्यक्ष चकोर यांच्या गाडीची काच फोडली

आप जिल्हाध्यक्ष चकोर यांच्या गाडीची काच फोडली

आप जिल्हाध्यक्ष चकोर यांच्या गाडीची काच फोडली

परभणी : आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्या दादाराव प्लॉट संभाजीनगर येथील घरासमोर उभ्या असलेल्या टाटा सफारी या गाडीवर शनिवार, दि.१२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास दगड मारून काच फोडण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत गाडीचे ५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी जिल्हाध्यक्ष चकोर यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हाध्यक्ष चकोर यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, ते परभणी शहरातील दादाराव प्लॉट येथील संभाजीनगर येथे मागील १ वर्षापासून सतीश गवळी यांच्याकडे कुटुंबासह किरायने राहतात. दि.१२ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घरी असतातना बाहेर फटाके वाजत असल्याचा आवाज येत होता. याचवेळी भाचा विश्वजीत बोबडे यांनी सांगितले की, कंपाऊंडच्या बाहेर उभी असलेली आपली टाटा सफारी एमएच २० जीपी ७७०० या गाडीच्या पाठीमागील काचेवर कुणीतरी अज्ञात इसमाने दगड मारून काच फोडलेली दिसत असल्याचे सांगितले.

घराबाहेर येवून पाहिले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अंदाजे ३ किलो वजनाचा दगड कारच्या पाठीमागील काचेवर मारल्याने काच फुटून अंदाजे ५००० रूपयांचे नुकसान झाले असल्याचे जिल्हाध्यक्ष चकोर यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी रात्री ११च्या सुमारास भारतीय न्याय संहिता ३२४ चार अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेबद्दल आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्थानिक नेत्यांनी चिंधी चाळे सोडावेत : सतिश चकोर
आम आदमी पार्टीच्या वतीने मराठा, धनगर व मुस्लीम समाज बांधवांच्या प्रश्नावर आवाज उचलण्यात येत आहे. खान- बाणच्या राजकारणाला तडा देत सर्व जाती धर्माच्या हक्कासाठी लढा देण्यात येत असल्याने स्थानिक नेत्यांच्या पोटात खळबळ निर्माण होत आहे. याचा परिणाम म्हणून सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास काही जणांनी मोटारसायकलवर येवून घरासमोर आरडा ओरड केली होती. नारायणगड येथून परत आल्यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कारच्या काचेवर दगड मारून काच फोडली आहे.

५०० ते १००० रूपये देवून असे प्रकार करण्यापेक्षा बेरोजगारांसाठी काम करा. स्थानिक नेत्यांनी चिंधी चाळे सोडावेत अन्यथा येणा-या काळात जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. स्थानिक नेत्यांनी अशा प्रकारचे चिंधी चाळे करू नयेत. पोलिस ठाण्यात देखील तक्रार देण्यासाठी गेलो असता कार्यकर्त्यांना दमदाटी करणा-या पोलिसांनी कारवर दगड मारून काच फोडणा-या आरोपींना अटक करावी असे आवाहन आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सतिश चकोर यांनी व्हीडीओच्या माध्यमातून समाज माध्यमावर बोलताना केले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR