22.6 C
Latur
Saturday, July 20, 2024
Homeपरभणीअखेर शस्त्रक्रिया झालेल्या त्या महिलेचा मृत्यू

अखेर शस्त्रक्रिया झालेल्या त्या महिलेचा मृत्यू

परभणी : शहरातील वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालय जवळ असलेल्या पांडुरंग सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये मंगळवारी एका महिलेची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करत असताना सदरील महिला अत्यवस्थ झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर नातेवाईकांनी हॉस्पीटलच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेची परीस्थिती अत्यवस्थ झाल्याचा आरोप करीत गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. या महिलेचा मंगळवारी रात्री उशीरा डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.

मानवत येथील रहिवासी असलेली महिला परभणी शहरातील शंकर नगर येथील आपल्या माहेरी आली होती. या महिलेला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी पांडुरंग सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. या महिलेवर मंगळवारी दुपारी डॉ. श्रूती डुब्बेवार या कुटुंब कल्याण शस्त्रक्रीया करीत असताना महिलेची तब्येत अत्यवस्थ बनली होती. दरम्यान महिलेची परीस्थिती गंभीर बनत असल्याने संबंधीत हॉस्पीटलने शहरातील अन्य तज्ञ डॉक्टरांना बोलावून घेतले. या डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली परंतू संबंधीत महिलेची तब्येत चिंताजनक झाली होती. अखेर या महिलेचा डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री उशीरा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या पश्चात ३ मुली, २ मुले, पती असा परीवार आहे. दरम्यान महिलेच्या मृत्यू नंतर शहरात उलट सुलट चर्चेला उधान आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR