बा-हाळी:प्रतिनिधी :
बा-हाळी ते देगलूर जाणा-या जामढव नदीवरील पुलाचे काम रखडल्यामुळे येणा-या जाणा-्या नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील बाराहाळी हे गाव मोठे सर्कल असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ भरते.
नदीपलीकडे असलेल्या सन्मुखवाडी, माकणी, कबनूर, वसुर,जेमला तांडा, या गावातील नागरिक आठवडी बाजार करण्याकरिता वं दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरिता नागरिकांना हा पुल ओलांडून यावे लागते.
त्याचबरोबर एखादा रुग्ण आजारी पडल्यास त्यास उपचारासाठी बाराहाळी येथील आरोग्य केंद्रात रात्री बे रात्री याच रस्त्याचा अवलंब करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. बाराहाळी ते देगलूर जाणा-या जामढव नदीचे काम गेल्या अनेक महिनापासून रेंगाळत पडले आहे.त्यामुळे तात्पुरता पुलाच्या बाजूने बनवण्यात आलेला खडतर कच्या रस्त्यावरून नागरिकास चालत जावे लागत आहे.
रस्ता हा अरुंद असल्यामुळे अनेकदा या खडतर रस्त्यावरून जात असताना दुचाकी स्वार वं नागरिक पाय घसरून खड्ड्यात पडल्याचे चित्र निदर्शनास आले असून येणा-या जाणा-या वाहतुकीची कोंडी होत आहे.