39.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयसातत्याच्या युध्दामुळे जग भूकबळीच्या उंबरठ्यावर

सातत्याच्या युध्दामुळे जग भूकबळीच्या उंबरठ्यावर

अनेक ठिकाणी रोज होतेय उपासमार संयुक्त राष्ट्राने केले सर्व्हेक्षण

न्यूयॉर्क /संयुक्त राष्ट्र : युद्धामुळे गाझावर मोठे संकट आले आहे. गाझाच्या लोकसंख्येपैकी किमान एक चतुर्थांश लोकसंख्या म्हणजेच तब्बल ५ लाख ७६ हजार लोकांची रोज उपासमार होत असून, त्यांना दोन वेळेचे पुरेसे जेवणही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे उपासमारीने त्रस्त असलेले लोक केवळ मदत साहित्य घेऊन जाणा-या ट्रकवर गोळीबार करत नाहीत, तर त्या ट्रकची लूटही करत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिका-याने ही माहिती दिली.

युद्धग्रस्त गाझाच्या २३ लाख लोकसंख्येला अन्न असुरक्षिततेचा किंवा त्याहूनही वाईट धोका निर्माण झाला आहे. उत्तर गाझामध्ये तर परिस्थिती आणखी बिकट असून येथे लोकांना अन्नपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंचा प्रचंड तुडवडा जाणवत आहे. जगभरातील भूक आणि उपासमारीने मानवजातीला सुरुवातीपासूनच उद्ध्वस्त केले आहे. अर्ध्या मानवी लोकसंख्येला अजूनही त्याचा त्रास होतो; सध्याच्या कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे आणि हवामान बदलामुळे ८७२० दशलक्षाहून अधिक लोक या दुर्बल करणा-या संकटाच्या मुठीत आहेत आणखी लाखो लोक संकटात आहेत. भुकेचे घातक चक्र एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जाते.

जी कुटुंबे दीर्घकाळ उपासमार आणि कुपोषणाशी झुंजत असतात त्यांच्या मनाला आणि शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांशिवाय सतत जातात, जे त्यांना त्यांच्या सर्वोत्तम क्षमतेनुसार कार्य करण्यास सक्षम होण्यापासून प्रतिबंधित करते. जगाच्या अनेक भागांमध्ये भूक आणि उपासमार कायम असताना, एकट्या दोन खंडांमध्ये, आफ्रिका आणि आशियामध्ये जगातील इतर कोठल्याहीपेक्षा जास्त भुकेले आणि कुपोषित लोक आहेत जे दरवर्षी उपासमारीने मरतात. जरी आफ्रिकेला विविध माध्यमांद्वारे केंद्रबिंदू म्हणून चित्रित केले गेले असले तरी आशियामध्ये नेहमीच जास्त भुकेले लोक राहतात. आशिया खंडात इतकी मोठी लोकसंख्या असल्याने अधिक कुपोषित बालके खंडात आढळू शकतात. जगात भुकेल्या लोकांची संख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून जगभरात भूक आणि उपासमार वाढली आहे

परिस्थिती आणखी बिघडणार
गाझामधील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. गाझाच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक भूकबळीच्या उंबरठ्यावर आहेत आणि उत्तर गाझामधील दोन वर्षांखालील सहा मुलांपैकी १ कुपोषणाने ग्रस्त आहे. २९,९५४ जणांचा इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये मृत्यू झाला आहे. ७०,३२५ जण गाझात गंभीर जखमी झाले आहेत. १,१३९ जणांचा इस्रायलमध्ये मृत्यू, तर ८,७३० जण जखमी झाले आहेत.

कुपोषणाची पातळी वाढते
गाझामधील बाल कुपोषणाची पातळी ही जगात सर्वाधिक गंभीर आहे. परिस्थिती बदलली नाही, तर उत्तर गाझामध्ये दुष्काळ पसरेल असे जागतिक अन्न कार्यक्रमाचे उपकार्यकारी संचालक कार्ल स्काऊने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR