23.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeसोलापूरआरोग्य केंद्रातील एक्सरे मशिन गेल्या अनेक दिवसांपासून बंदच

आरोग्य केंद्रातील एक्सरे मशिन गेल्या अनेक दिवसांपासून बंदच

सोलापूर : शहराची हद्दवाढ झाल्यानंतर सोरेगावचा समावेश महापालिका हद्दीत झाला. सोरेगाव येथील आरोग्य केंद्रावर या परिसरातील ६० हजार नागरिक अवलंबून आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून एक्स-रे मशिन बंद आहे, शिवाय प्रसूतीची देखील गैरसोय आहे. या ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याने हे आरोग्य केंद्रच अशक्त झाले आहे.

या केंद्रांतर्गत सोरेगावासह विजापूर रोड परिसरातील नागरी वसाहतीत आरोग्याच्या सुविधा दिली जाते. शिवाय राज्य व केंद्र सरकारच्या आरोग्याच्या योजनांचा लाभनागरिकांना मिळवून देण्यात येतो. मात्र येथे फक्त जुजबी उपचाराची सोय असून प्रसुतीची सुविधा नाही. सोरेगावचा परिसर हा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच सोलापूर विजापूर महामार्गासह बा वळण रस्ताही येथून गेला आहे. हा परिसर शहरापासून दूर आहे. हद्दवाढ भागातील इंचगेरी मठापासून ते डी मार्टसह राज्य राखीव पोलीस बल आदी परिसरासाठी या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शेतशिवारही कांही प्रमाणात याच केंद्रातर्गत येते. राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या आरोग्य योजना येथून राबवली जाते. गरोदर मातांची माहिती संकलन करून ते शासनाला सादर करण्यात येते.

मुळात सोरेगावची परिस्थितीच ग्रामीण भागासारखी आहे. अन्य आरोग्याची सुविधा देणारी एकही आरोग्य संस्था नाही. नागरी आरोग्य केंद्राची मोठी इमारत आहे. मात्र या इमारतीतून येथील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणे अवघड झाले आहे. प्रसूतीसह अन्य किरकोळ आजाराच्या तपासणीसाठी असलेली एक्सरे मशिन गेल्या कांही दिवसापासून बंद अवस्थेतच आहे. ती चालू करण्याची तसदी येथील प्रशासनासह वरिष्ठांकडून झाली नाही. ती मशिन चालू झाल्यास येथील लोकांना त्याचा उपयोग होणार आहे.

प्रसूतीसह रक्त नमुन्याचे सर्व प्रकाराची तपासणी आणि एक्सरे काढणे, सोनोग्राफी तपासणीची सोय उपलब्ध झाल्यास येथील नागरिकांना चांगला उपयोग होऊ शकतो. यासाठी महापालिका प्रशासनाकडून अशक्त नागरी आरोग्य केंद्राला सशक्त करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. तरच या केंद्राचा उपयोग या भागातील नागरिकांना होणार आहे.येथील नागरी आरोग्य केंद्राची इमारत मोठी आहे. मात्र या ठिकाणी सोयी पेक्षा गैरसोयीच जास्त आहेत. येथे लहान मुलांच्या आरोग्यासाठी बालरोग तज्ज्ञाची नेमणूक करावी. यासह अन्य तपासणीही होणे महत्त्वाची आहे तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केल्यास बा रुग्णांची संख्या वाढणार असून, महापालिका प्रशासनाने नागरी आरोग्य केंद्र सक्षम करावे.अशी मागणी होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR