22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयबलात्काराच्या धमक्या येत आहेत

बलात्काराच्या धमक्या येत आहेत

‘आप’ खासदार स्वाती मालीवाल यांचा आरोप

नवी दिल्ली : ‘आप’च्या खासदार स्वाती मालीवाल आणि पक्षातील नेत्यांमध्ये वाद आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्यानंतर आता पक्षातील लोकांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणावर व्हीडीओ पोस्ट करणा-या यु-ट्यूबर ध्रुव राठीलादेखील जबाबदार धरले आहे.

रविवारी स्वाती मालीवाल यांनी एक्सवर पोस्ट केली की आपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी चारित्र्यहनन मोहीम सुरू केल्यानंतर आता मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तक्रार मागे घेण्यासाठी मला धमकावले जात आहे. यु-ट्यूबर ध्रुव राठीने माझ्याविरोधात एकतर्फी व्हीडीओ पोस्ट केल्यावर यात आणखी वाढ झाली आहे. माझी बाजू मांडण्यासाठी मी ध्रुव राठीला फोन केला; पण त्याने दुर्लक्ष केले. त्याच्यासारख्या स्वतंत्र पत्रकाराने ‘आप’च्या इतर प्रवक्त्यांसारखे वागणे लज्जास्पद आहे.

घटना मान्य करून पक्षाचा ‘यू टर्न’
ध्रुव राठीच्या व्हीडीओबाबत आपले मत मांडताना मालीवाल यांनी काही मुद्दे मांडले. घटना मान्य करून पक्षाने यू-टर्न घेतला. एमएलसी अहवालात हल्ल्यामुळे झालेल्या जखमा, व्हीडीओचा एक भाग प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर आरोपीने फोन केला. आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. पुराव्याशी छेडछाड करण्यासाठी त्याला पुन्हा तिथे का जाऊ दिले? जी महिला नेहमी योग्य मुद्यांसाठी उभी राहिली, अगदी सुरक्षेशिवाय एकटी मणिपूरला गेली, तिला भाजप कसे विकत घेईल?, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR