४ वर्षांत कोरोनासारखी मोठी साथ येण्याची शक्यता

वॉशिंंग्टन : पुढील चार वर्षांत जगभरात कोरोनासारखी आणखी एखादी मोठी साथ येण्याची १० ते १५ टक्के शक्यता आहे असा दावा मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केला. एका अमेरिकी वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले की, संकटांना तोंड देण्यासाठी अधिक पूर्वतयारी केली पाहिजे. पण, लोकांनी तशी तयारी केलेली दिसत नाही. कोरोनासारखी भीषण साथ भविष्यात पसरली, तर तिला रोखण्यास जग सज्ज नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक सुविधांच्या कमतरतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बिल गेट्स यांनी २०२२मध्ये आगामी काळातील साथ कशी रोखावी या विषयावर एक पुस्तक लिहिले. साथी, तसेच विविध आजारांना रोखण्यासाठी कशा प्रकारचे जागतिक आरोग्य धोरण असावे याविषयीची आपली मते गेट्स यांनी मांडली. कोरोनासारखी एखादी प्राणघातक साथ पुन्हा पसरली, तर तिला रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना सध्यातरी कोणत्याही देशाकडे दिसत नाही. ही वस्तुस्थिती गेट्स यांच्यासारख्या दूरदर्शी व्यक्तीला दिसत असल्याने ते यासंदर्भात सर्वांना सतर्क करण्याचे काम करत आहेत.

२०१५ मधील भाकीत खरे ठरले
जगात पसरणा-या साथी व त्यापासून मानवी जीवनाला असलेला धोका, याबाबत बिल गेट्स अनेक वर्षांपासून लोकजागृती करत आहेत. २०१५ साली टेड टॉक या कार्यक्रमात गेट्स यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, प्राणघातक साथीचा मुकाबला करण्यासाठी जगाने कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही. त्यांनी व्यक्त केलेली ही भीती कोरोनाच्या साथीमध्ये खरी ठरली. नोव्हेंबर २०१९मध्ये सुरू झालेली कोरोनाची साथ काही महिन्यांत जगभरात पसरली. आतापर्यंत कोरोनामुळे ७ लाख १० हजार लोकांचा मृत्यू झाला.

पूर्वीच्याच चुकांची होते पुनरावृत्ती
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी अमेरिकी वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जागतिक सहकार्य व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे साथींवर नियंत्रण मिळविणे कठीण जाते. आपल्याकडे कोणत्या साधनांची कमतरता आहे. याबद्दल जगातील सर्व देशांनी एकमताने निर्णय घेतला व त्या साधनांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले तर अनेक अडचणी दूर करता येतील. मात्र तसे न होता पूर्वी केलेल्या चुकांची अनेक देश पुनरावृत्ती करत आहेत असे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news