17.8 C
Latur
Wednesday, December 11, 2024
Homeमहाराष्ट्रसांगलीमध्ये भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ

सांगलीमध्ये भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ

सांगली : सांगलीमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. सांगलीमधील भाजप नेते सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आली आहे. कु-हाडीने सपासप वार करत खाडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. सांगलीमधील पंढरपूर रोडवर खाडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू करण्यात आल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतजमिनीच्या वादातून कु-हाडीने वार करून सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतील पंढरपूर रोडवरील राम मंदिराजवळ ही घटना घडली. खाडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर एकच खळबळ माजली. मंदिराच्या जवळ असलेल्या लोकांची गर्दी झाली. जखमी अवस्थेत खाडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मिरज पोलिसांचे पथक दाखल झाले असून तपास सुरू आहे.

सुधाकर खाडे हे सांगलीमधील भाजपचे नेते आहेत. त्याआधी ते मनसेमध्ये होते. सांगलीचे मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वी खाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. सुधाकर खाडे यांच्या हत्येने सांगलीमध्ये खळबळ माजली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR