अटक आणि ताब्यात घेणे यांच्यात फरक नाही

नवी दिल्ली : राज्यघटनेच्या अनुच्छेद २२(२) नुसार, एखाद्या व्यक्तीला दंडाधिका-यांसमोर हजर करण्यासाठीचा २४ तासांचा कालावधी हा केवळ औपचारिक अटकेच्या वेळेपासून नव्हे, तर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या वेळेपासूनच सुरू होईल असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने आज (दि. ५ नोव्हेंबर) अटक आणि ताब्यात घेणे यांच्यातील कृत्रिम फरकाबाबत निकाल दिला.

सीमाशुल्क आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत चौघा संशयित आरोपींचा जामीन त्रिपुरा उच्च न्यायालयाने फेटाळला होता. या प्रकरणी २९ सप्टेंबर २०२५ रोजी शोध आणि जप्ती प्रक्रियेदरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आले होते, परंतु अधिकृतपणे त्यांना ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अटक केल्याचे दाखवण्यात आले. याविरोधात संशयितांनी सर्वोच्­च न्­यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती अतुल एस. चांदुरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, राज्यघटनेच्या अनुच्छेद २२(२) नुसार, एखाद्या व्यक्तीला दंडाधिका-यांसमोर हजर करण्यासाठी विहित केलेली २४ तासांची मुदत ही स्थानबद्धतेच्या काळापासून सुरू होईल. २४ तासांचा कालावधी केवळ अधिकृत अटकेपासून सुरू होतो, हा दृष्टिकोन राज्यघटनेच्या अनुच्छेद २२(२) आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम ५६ मधील घटनात्मक तरतुदींच्या विरोधात आहे.

केवळ एकच अपवाद
खंडपीठाने राज्यघटनेच्या अनुच्छेद २२(२) चा हवाला देत स्पष्ट केले की, प्रत्यक्ष औपचारिक अटकेपूर्वी चौकशी किंवा जप्ती यासाठी पोलिसांनी घालवलेला वेळ २४ तासांच्या मुदतीतून वगळता येणार नाही. यासंदर्भात राज्यघटनेत केवळ एकच अपवाद देण्यात आला असून तो म्हणजे अटकेच्या ठिकाणापासून ते न्यायालयापर्यंतचा प्रवासाचा वेळ. त्यामुळे, पोलिसांनी नोंदवलेल्या औपचारिक अटकेच्या वेळेपासून किंवा तपास पूर्ण झाल्यानंतरच २४ तासांची मुदत सुरू होते असा दावा करणे पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबा असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

अल्प काळासाठीची स्थानबध्दता अटकच
अल्प काळासाठी केलेली स्थानबद्धता म्हणजे अटक नव्हे या दृष्टिकोनाशी न्यायालयाने असहमती दर्शवत स्पष्ट केले की, मूलभूत अधिकार्यांचे तात्पुरते निलंबन होऊ शकत नाही. दंडाधिका-यांनी स्थानबद्धतेची तारीख आणि वेळ नोंदवून घ्यावी आणि त्या स्थानबद्धतेच्या वेळेपासून २४ तासांच्या मुदतीचे पालन झाले आहे की नाही, याची खात्री करावी. स्थानबद्धता आणि अटक यांच्यात कृत्रिम फरक करण्याचा कोणताही प्रयत्न घटनात्मकदृष्टया अमान्य आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

उच्च न्यायालयांच्या मतांशी दर्शवली असहमती
ओरिसा उच्च न्यायालयाने आर्यमान पटनायक प्रकरणात, केरळ उच्च न्यायालयाने अरुण के. थॉमस’ प्रकरणात आणि मद्रास उच्च न्यायालयाने ‘कन्नन’ प्रकरणात व्यक्त केलेल्या मतांशी सर्वोच्च न्यायालयाने असहमती दर्शवली. या उच्च न्यायालयांनी म्हटले होते की, अटकेपूर्वीच्या स्थानबद्धतेचा कालावधी राज्यघटनेच्या अनुच्छेद २२ अंतर्गत येणा-या २४ तासांच्या मर्यादेतून वगळला जाऊ शकतो.

केरळ हायकोर्टाचा दृष्टिकोन स्वीकारला
न्यायालयाने बिस्वजित मंडल प्रकरणातील केरळ उच्च न्यायालयाचा दृष्टिकोन स्वीकारला. केरळ उच्­च न्­यायालयाने स्­पष्­ट केले होते की राज्यघटनेच्या अनुच्छेद २२(२) अंतर्गत एखाद्या आरोपीला दंडाधिका-यांसमोर हजर करण्यासाठीची २४ तासांची मुदत, पोलिसांनी अधिकृतपणे अटक नोंदवल्याच्या वेळेपासून नव्हे, तर व्यक्तीला ताब्­यात घेतल्­यापासूनच्­या क्षणापासून सुरू होते.

अटक केलेली व्यक्ती आणि कोठडीत ठेवलेली व्यक्ती एकच समजावी
खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, अनुच्छेद २२(२) मध्ये अटक केलेली आणि कोठडीत ठेवलेली प्रत्येक व्यक्ती” असा शब्दप्रयोग वापरला आहे. अटक केलेली आणि कोठडीत ठेवलेली हे शब्द एकत्रितपणे आणि संयुक्त अर्थाने समजले पाहिजेत. हे शब्द एकत्रित आणि संयुक्त स्वरूपाचे असल्याने, त्यातील दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो. कारण राज्यघटना अटक आणि स्थानबद्धता यांच्यात कोणताही फरक करत नाही असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news