27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयवृद्धांना आरोग्य विम्यासाठी आता उत्पन्नाचे निर्बंध नाहीत

वृद्धांना आरोग्य विम्यासाठी आता उत्पन्नाचे निर्बंध नाहीत

७० वर्षे वयोगटातील वृद्धांचा समावेश ज्येष्ठांना दर वर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त फायदा

नवी दिल्ली : आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेत आता ७० वर्षे वयोगटातील वृद्धांचा समावेश करण्यात आला आहे. उत्पन्नस्तरावरील निर्बंध काढून टाकून, वाढता वैद्यकीय खर्च लक्षात घेऊन, वृद्धांच्या आरोग्यासंबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत आवश्यक आरोग्य विमा कवच प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तर या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना दर वर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळेल. आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करणा-या प्रत्येकासाठी ही सोन्याची संधी आहे असे म्हणायला हरकत नाही.

पूर्वी, आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना प्रामुख्याने ४० टक्के लोकसंख्येला कव्हर करत आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना सेवा देणार आहे. या निर्णयाचा देशातील ४.५ कोटी कुटुंबांमधील ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच या योजनेत ७० आणि त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक लाभार्थीला नवीन हेल्थ कार्ड (नवीन व स्वतंत्र आयुष्मान कार्ड) मिळेल; ज्यामुळे आरोग्यसेवा फायद्यांचा त्यांना लाभ घेता येईल.

तसेच एकाच कुटुंबातील अनेक ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असल्यास, पाच लाख रुपये त्यांच्यामध्ये विभागले जातील. प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे हे पाऊल अत्यावश्यक आहे, कारण भारतात विभक्त कुटुंब संरचना आहे.
जेथे वृद्ध व्यक्तींवर आर्थिक भार आहे, त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल.

योजनेसाठी पात्रता काय?
कौटुंबिक आधारावर लागू असलेल्या या योजनेअंतर्गत ७० आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विमा कवच योजनेसाठी पात्र आहेत.

फक्त ज्येष्ठांना लाभ
आयुष्मान भारत योजनेंतर्गत आधीच समाविष्ट केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्य विम्याच्या अतिरिक्त पाच लाख रुपये टॉप-अप कव्हर म्हणून देण्यात येईल. पण या रकमेचा उपयोग फक्त ज्येष्ठ नागरिक करू शकतात. पण, त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत.

खासगी आरोग्य विमा
खासगी आरोग्य विमा पॉलिसी असलेले ज्येष्ठ नागरिकदेखील त्यांच्या विद्यमान कव्हरेजला धक्का न लागू देता या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

इतर सार्वजनिक आरोग्य योजना
सीजीएचएस, ईसीएचएस किंवा आयुष्मान सीएपीएफद्वारे संरक्षित ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा सध्याचा सार्वजनिक विमा किंवा नवीन आयुष्मान भारत आरोग्य योजना यातील एकच पर्याय निवडणे बंधनकारक असणार आहे.

नवीन आरोग्य कार्ड
सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना योजनेचे लाभ मिळवण्यासाठी एक वेगळे (आयुष्यमान कार्ड) कार्ड दिले जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR