22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रनीलेश लंके घरवापसीच्या चर्चेत तथ्य नाही

नीलेश लंके घरवापसीच्या चर्चेत तथ्य नाही

पुणे : अहमदनगरमधील पारनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्वत: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. असे अनेक लोक आमच्या पक्षात येण्यास इच्छूक आहेत, अनेकांची चर्चा आहे. मात्र, लंके यांच्याबाबतीत यात काहीही तथ्य नाही, असे म्हणत पवार यांनी सकाळी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही चर्चा फेटाळून लावली. आज सकाळपासून जोरदार सुरू असलेली ही चर्चा शरद पवार यांनी एका वाक्यात फेटाळून लावली. ही चर्चा मला तुमच्याकडूनच कळते आहे, असेही पवार म्हणाले.

नीलेश लंके परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. खासदार अमोल कोल्हे यांनी लंकेंना परतीची साद घातली होती. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे गणित लक्षात घेऊन आमदार नीलेश लंके आज घरवापसी करणार असल्याचे बोलले जात होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून लंके पुन्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याची चर्चा होती. तसं झालं असतं तर परतीच्या मार्गाने आलेले लंके पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले असते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे फुटीच्या लंके अजितदादांसोबत गेले होते. मुख्य म्हणजे त्यावेळी त्यांनी आपली भूमिका दोनदा बदलली होती. त्यानंतरही त्यांनी आपण नेमके कोणासोबत आहोत, हे स्पष्ट होऊ दिले नव्हते. लंके आपल्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार या दोघांचेही फोटो वापरत होते. नुकताच त्यांचा वाढदिवस झाला. त्याच्या जाहिराती करतानाही अब दिल्ली दूर नही, अशी टॅग लाईन, संसद भवनाचा फोटो आणि दोन्ही पवारांचे फोटो अशी रचना लंके यांनी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR