36.3 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रघर में घुसके मारेंगे, मग कुलभूषण जाधव यांना का नाही आणले?

घर में घुसके मारेंगे, मग कुलभूषण जाधव यांना का नाही आणले?

संजय राऊत यांचा परखड सवाल

मुंबई : राणाला अमेरिकेतून आणले याचे कौतुक आहे पण भाजपने हे ठरवले पाहिजे की, या राणाला खटला चालवून फासावर लटकवायला आणलेले आहे की क्रेडिट घ्यायला आणले आहे. राणा फेस्टिव्हल करायचा आहे का? असा परखड सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. २००९ पासून सातत्याने या राणाला आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत होते. ते मोदीचे सरकार, यूपीए सरकार असे म्हणणे अयोग्य आहे.

सन २००९ साली एनआयएने या राणा आणि हेडली विरुद्ध पहिली एफआयआर लॉज केली. त्यावेळी एनआयएच पथक शिकागो येथे जाऊन राणा आणि हेडलीची चौकशी करुन आले असे संजय राऊत म्हणाले. सन २०१२ साली तत्कालीन विदेश मंत्री सलमान खुर्शीद, तेव्हाचे विदेश सचिव अमेरिकेत गेले. त्यांनी राणाला भारतात पाठविण्यासाठी अमेरिकन सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्यासोबत चर्चा केली. ही एक प्रक्रिया आहे. मी भारत सरकार म्हणेन, कोणताही पक्ष नाही. क्रेडिट घ्यायचे असेल, तर पुतळे उभारा, भाजपवाल्यानी त्याखाली फोटो काढावा अशी टीका संजय राऊत यांनी केली.

देशाच्या सुरक्षेचा प्रश्न
देशाच्या सुरक्षेचा विषय आहे, मग पुलवामाचा क्रेडिट घ्या पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांना सोडवू शकलेला नाहीत. भाजपवाले म्हणतात घर में घुसके मारेंगे पण कुलभूषण जाधव, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना घेऊन या अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR