22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रथोड्या दिवसांनी बोलतील मी मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो

थोड्या दिवसांनी बोलतील मी मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो

ठाणे : सन २०२२ मध्ये शिवसेना आणि २०२३ मध्ये राष्ट्रवादी भाजपने फोडली, हे करून देखील महाराष्ट्राला काय मिळाले? जानेवारी महिन्यात वायब्रांत गुजरातमध्ये २६ हजार कोटींची गुंतवणूक त्यांनी घेतली, पण ३ पक्ष आणि एक परिवार फोडून त्यांनी काय मिळवले? अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आदित्य ठाकरे यांची महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र यात्रा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात पोहोचली. यावेळी बोलताना आदित्य यांनी कडाडून हल्ला चढवला. तुमच्या माथ्यावर लिहिलेला गद्दार, बाप चोर हा शिक्का तुम्ही कधीही पुसू शकणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, २० मे २०२२ रोजी हे असेच वर्षा बंगल्यावर आल्यानंतर रडत होते. भाजप मला आत टाकेल, मला जमणार नाही, असे म्हणत होते आणि एक महिन्यात ते भाजप सोबत गेले. ते पुढे म्हणाले की, एका निर्लज्ज माणसाने, ज्याला आधीपासून विधानसभा तिकीट एमएसआरडीसी, नगरविकास खाते दिले, उध्दव साहेबांनी विश्वास ठेवला, पण याच माणसाने विश्वासघात केला. ते पुढे म्हणाले की, ठाण्यात आल्यावर मन भरून येते, जुन्या आठवणी येतात, १९९४ आसपास, घरात आनंदाचे वातावरण होते, आजी खुश होती, दिघे फटाके फोडत होते. असे आठवले की वाटते गद्दार गेले ते गेले पण शिवसैनिक इथेच आहेत. इथे महिलांचे कार्यक्रम जास्त झाले आहेत. महिलांचा उध्दव ठाकरे यांच्यावर जास्त विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

हल्ली नवी पद्धत झाली आहे, खोटे बोला पण रडून बोला. कालचे अधिवेशन हे यासाठी होते की मी किती अपयशी आहे हे मुलाने सांगितले. हे मी खूप वेळा बघितले आहे, रडून सगळे मिळवायचे. थोड्या दिवसांनी बोलतील मी घटनाबा मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो, पण एक माणूस म्हणून पण अपयशी ठरले आहेत, गेल्या दीड वर्षात एकही नवीन उद्योग आला नाही. इथून एक एक गोष्ट गुजरातला पाठवत आहेत. थोड्या दिवसांनी हे मंत्रालय देखील गुजरातला हळवतील. आज जो विकास होतोय तो यांच्या बिल्डर मित्राचा होत आहे. हे विकास आणत नाहीत, दिल्लीत जातात ते स्वत: साठी जातात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR