चोरट्यांनी हिंगोली जिल्हाधिका-यांच्या अंगणातून चंदनाचे झाड पळवले

हिंगोली : शहरात जिल्हाधिका-यांच्या निवासस्थानच्या अंगणातील चंदनाचे झाड चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ता. ११ हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहे.

हिंगोली शहरात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी त्यांच्या सुुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला असून दर आठ तासांना दोन कर्मचारी कर्तव्यावर येतात. या शिवाय अंगणातील झाडांची देखभाल करण्यासाठी एक माळीकाम करणा-या कर्मचा-याचीही नियुक्ती आहे.

दरम्यान, रविवारी ता. १० रात्री नेहमी प्रमाणे पोलिस कर्मचारी कर्तव्यावर होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश करून त्या ठिकाणी असलेले चंदनाचे झाड तोडून नेले. मात्र या घटनेची कानोकान खबरही त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या कर्मचा-याला लागली नाही.

दरम्यान, आज सकाळी त्या ठिकाणी माळी काम करणारे शिवप्रसाद शिंदे हे आल्यानंतर त्यांना चंदनाचे झाड दिसले नाही. त्यांनी सदर प्रकार जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या कानावर टाकला. तसेच शहर पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार पोटे, अशोक धामणे, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, शेख मुजीब यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन ते तीन जण झाडाच्या जवळ असल्याचे दिसून आले आहे. मात्र सीसीटीव्ही मध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

या घटनेमुळे पोलिस दलासह जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली असून यापुर्वीही एक चंदनाचे झाड चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्या चोरीचा अद्यापही तपास लागला नाही त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news