27.8 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeमहाराष्ट्रयंदा बंडखोर ठरविणार सरकारचे भविष्य!

यंदा बंडखोर ठरविणार सरकारचे भविष्य!

मुंबई : प्रतिनिधी
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीसारखी स्थिती आताच्या विधानसभा निवडणुकीत दिसत आहे. राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी न दिल्याने मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा तब्बल सहा प्रमुख पक्ष उतरले आहेत. तसेच तिसरी आघाडी आणि ठिकठिकाणी अपक्ष आहेत. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे ३५ अपक्ष आमदार निवडून आले, तर यंदा राज्य सरकारचे चित्र बदलू शकते.

दरम्यान, ४ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. बंडखोरांचे बंड शमविण्याचा दिवस होता. महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरांचे बंड थंड करण्यात काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अपयश आले आहे. आताच्या बंडखोरांची स्थिती पाहता, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होईल अशी जोरदार चर्चा सध्या राज्यात रंगली आहे.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीसारखी स्थिती आताच्या विधानसभा निवडणुकीत दिसत आहे. राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी न दिल्याने मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा तब्बल सहा प्रमुख पक्ष उतरले आहेत. तसेच तिसरी आघाडी आणि ठिकठिकाणी अपक्ष आहेत. एकूणच यंदाची निवडणूक उमेदवारांच्या अंगाने ख-या अर्थाने बहुरंगी लढतींची बनली आहे. बंडखोरीमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकालही बदलू शकतो.

बहुमतापासून रोखणार?
महाविकास आघाडी आणि महायुतीला बहुमतापासून रोखू शकतो. शिवाय, ४० च्या आसपास अपक्ष आमदार जिंकून आल्याने १९९५च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ शकते. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे ४० ते ४५ अपक्ष आमदार निवडून आले, तर यंदा राज्य सरकारचे चित्र बदलू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR