24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयविनाशाचे समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे : प्रियंका गांधी

विनाशाचे समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : हमास आणि इस्राईलमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. गाझा पट्टीवर इस्राईल सातत्याने हल्ले करत आहे. ज्याबाबत वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, इस्राईल-हमास युद्धावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी दिलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, या विनाशाचे समर्थन करणाऱ्या सरकारांना लाज वाटली पाहिजे. प्रियंका गांधी यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, नरसंहाराचे समर्थन करणाऱ्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला कोणताही धक्का बसलेला नाही. गाझामध्ये १० हजारांहून अधिक लोक मारले गेले, त्यापैकी जवळजवळ निम्मे मुले होती. जे निंदनीय आणि निंदनीयच आहे. या विनाशाचे समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.

प्रियंका गांधी म्हणाल्या, डब्लूएचओनुसार दर दहा मिनिटांनी एका मुलाची हत्या होत आहे. ऑक्सिजनअभावी त्याचा मृत्यू होत आहे. तरीही ज्यांनी नरसंहाराचे समर्थन केले त्यांच्या विवेकबुद्धीला धक्का बसला नाही. युद्धविराम नाही, फक्त आणखी बॉम्ब, अधिक हिंसाचार, अधिक हत्या आणि अधिक दुःख.

गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गाझामधील हमासला संपवण्यासाठी इस्राईलने केलेल्या हल्ल्यात ११,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत. या अहवालात म्हटले आहे की, मृतांमध्ये हजारो महिला आणि लहान मुले यांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR