39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रखुर्चीसाठी विचार सोडले

खुर्चीसाठी विचार सोडले

मुंबई : कोणत्याही खुर्चीपेक्षा आपला स्वाभीमान महत्वाचा आहे, ही शिकवण बाळासाहेंबानी दिली आहे. तुम्ही आमदार व्हाल, खासदार व्हाल, मंत्री व्हाल पण तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे विसरु नका. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. यांनी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात शिंदे बोलत होते. स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरÞात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडे सांभालते है असे चालत नाही असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक, असा टोलादेखील त्यांनी लगावला. जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केला आहे. आज बाळासाहेब असते तर आपल्या सगळ््यांची पाठ त्यांनी थोपाटली असती. तुम्ही साथ दिली म्हणून शेतक-याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसेना हे आपले उद्दीष्ट असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवसेनेचा भगवा सदैव फडकवत ठेऊ
माझ्यासोबत सगळ्यांनी रात्रीचा दिवस केला. मोठा विजय मिळवला आहे. अजूनही दुप्पट वेगाने चौपट काम करावं लागेल. शिवसेनेच भगवा सर्वांच्या साथीने फडकवत ठेवेल. बाळासाहेबांच्या विचारांशी कदापि प्रतारणा होणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR