उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील श्री संत आप्पाजी महाराज मंदिर संस्थान तसेच तिऱ्हे ग्रामस्थ यांच्या वतीने सुरू असलेल्या रामायणातील लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा गुरुवार दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्य भक्तीमय वातावरणात पार पडला.
दुपारी ३ वाजता गावातील ग्रामदैवत मसोबा मंदिरापासून टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली.ही दिंडी संपूर्ण गावातून सर्व भाविक भक्तांच्या उपस्थित काढण्यात आली.त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रामायण ग्रंथ वाचण्यास सुरुवात करण्यात आली.
सकाळी ६ वाजे पर्यंत हे वाचन करण्यात आले.यावेळी विविध गावातील लोकांनी वाचक सूचक म्हणून हजेरी लावली. तद्नंतर लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा संपन्न झाला. शेवटी आरती आणि पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी शिरापूर, टाकळी,शिवणी, पाथरी,मन गोळी, तेलगाव, गावडी दारफळ, कातेवाडी आदी गावातील लोकांनी हजरोंच्या संख्येने हजेरी लावली.तसेच पंचक्रोशीतील लोक उपस्थित होते.