22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रगोंड गोवारींचे आंदोलन; नागपुरात हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर

गोंड गोवारींचे आंदोलन; नागपुरात हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर

नागपूर : आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातील संविधान चौकात समितीचे ३ आंदोलक मागील ११ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र या उपोषणाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या तीन आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आदिवासी गोंड गोवारी जमात संघर्ष हक्क कृती समितीचे हजारो कार्यकर्ते, आंदोलक संविधान चौकात जमा झाले आहेत.

गेल्या २६ जानेवारीपासून या आंदोलकांनी नागपुरात आमरण उपोषण सुरु केले. उपोषणार्थींची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. शासनाच्या या कृती विरोधात आदिवासी गोंड गोवारी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

आपले अधिकार आणि हक्कासाठी आज ५ फेब्रुवारीला भव्य मोर्चा काढला. शासन मागण्यांच्या विषयी गंभीर नसून फक्त आश्वासन देऊन समाजाची दिशाभूत केली जात आहे. त्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपोषण मंडपास भेट देत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहिल, असा इशारा या मोर्चातून देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR