26.2 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeराष्ट्रीयआरबीआयची इमारत बॉम्बने उडविण्याची धमकी

आरबीआयची इमारत बॉम्बने उडविण्याची धमकी

रशियन मेलमुळे खळबळ

मुंबई : गेल्या आठवड्याभरात दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. सततच्या मिळणा-या धमक्यांमुळे दिल्ली पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. ही धमकी नेमकी कोण आणि कशाकरिता देत आहे, यामागचे कोणतेही कारण समोर येऊ शकलेले नाही.

अशातच आता मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे. याआधी सुद्धा अशा प्रकारे धमकी मिळालेल्या आहेत. मात्र, आता थेट रशियन भाषेत हा ई-मेल आल्याकारणाने खळबळ उडाली आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर रशियन भाषेत धमकीचा मेल आला आहे.

काही दिवसांपूर्वीच संजय मल्होत्रा यांनी आरबीआयच्या गव्हर्नर पदाचा पदभार सांभाळला. त्यानंतर लगेच गुरुवारी (ता. १२ डिसेंबर) दुपारी आरबीआयच्या अधिकृत मेल आयडीवर रशियन भाषेतील धमकीचा मेल आला. ही घटना आज शुक्रवारी (ता. १३डिसेंबर) उघडकीस आली. परंतु, या मेलची तक्रार लगेच माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तर याप्रकरणी तपास सुरू असल्याचे मुंबई पोलीस झोन १ च्या डीसीपींकडून सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्यातही आरबीआयला अशाच प्रकारे धमकी मिळाली होती. परंतु, दिल्लीतील शाळांना वारंवार मिळणा-या धमकीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR