22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनसलमान खानच्या जीवाला धोका?

सलमान खानच्या जीवाला धोका?

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सतर्कता

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यामुळे मुंबई पोलिस सतर्क झाले असून, त्यांनी अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. कारण बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सर्व जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करून बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून, सलमान खान आणि दाऊद इब्राहिमच्या जवळ असल्याने बाबा सिद्दिकीची हत्या करण्यात आल्याचे बिश्नोई गँगने या पोस्टमध्ये म्हटले आहे. यापूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. यामुळे सलमानच्या जीवाला धोका वाढला आहे.

अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षेसाठी पोलिस तैनात आहेत. शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी यांची त्यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता पोलिस सतर्क झाले आहेत. पोलिस सलमान खानच्या घराबाहेर कोणालाही थांबू देत नसल्याची माहिती देखील समोर येत आहे. सलमान खान आणि बाबा सिद्दिकी यांची चांगली मैत्री होती.

सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीसाठी देखील सलमान दरवर्षी उपस्थित राहायचा. सलमान आणि शाहरूखमधील वाद देखील बाबा सिद्दिकी यांनी मिटवला होता. बाबा सिद्दिकी यांच्या निधनानंतर सर्व बॉलिवूड हादरल्याचे बघायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दु:ख व्यक्त केले आहे. तर बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची माहिती मिळताच सलमान खान, संजय दत्त, शिल्पा शेट्टी लीलावती रुग्णालयात पोहोचले होते.

सलमानच्या जीवाला देखील धोका
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या जीवाला देखील धोका असल्याचे सांगितले जात आहे. कारण सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. गुंड बिश्नोई याने सलमान खान याला देखील अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे सलमान खान याच्या ‘बिग बॉस १८’ शोची शूटिंग देखील थांबवण्यात आली असून, सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR