22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeनांदेडमारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून तीन युवतींचा मृत्यू

मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून तीन युवतींचा मृत्यू

किनवट : तालुक्यातील मारेगाव (खा)येथे पाण्यात बुडून तीन युतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (12 वर्षे,) पायल देविदास कांबळे (16 वर्ष, ) ममता सुरेश विविधकर (19 वर्ष) रा.मारेगाव (खालचे) ता.किनवट ह्या मुली शेजारील असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पायघसरून पडल्यामुळे एकीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली असता पाण्यात बुडत असताना तीनही मुलींनी एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तीनही मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी पंचनामा करून तीनही मुलींना उत्तरिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण्यात आले आहे. युवतींना उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम साठी आणण्यात आले आहे उत्तरिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे तर वृत्त लिहीपर्यंत पूर्ण माहिती उपलब्ध झाली नाही समोरील तपास पोलीस उपनिरीक्षक मामीडवार हे करीत आहेत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR