30.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रसोलापूर-पुणे-कल्याण बायपासवर तीन वाहनांचा अपघात, २ ठार, २ जखमी

सोलापूर-पुणे-कल्याण बायपासवर तीन वाहनांचा अपघात, २ ठार, २ जखमी

अहमदनगर : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता अहमदनगरमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. नगर शहराच्या बाहेरून जाणा-या बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात दोन जण ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर-पुणे-कल्याण बायपासवर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. सुरुवातीला बायपासवर ट्रेलर आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यानंतर अपघातग्रस्त ट्रेलरला एका कारने मागून धडक दिली. या भीषण अपघातात ट्रेलर आणि ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे बायपास रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR