22.3 C
Latur
Monday, October 21, 2024
Homeमहाराष्ट्रपाच नक्षल्यांना कंठस्नान

पाच नक्षल्यांना कंठस्नान

घातपाताचा कट उधळला, गडचिरोलीत कारवाई

गडचिरोली : प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिस दलाच्या सी ६० जवानांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात नक्षल्यांचा घातपाताचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे गडचिरोली पोलिसांचे हे खूप मोठे यश असल्याचे सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विध्वंसक कारवाया करून घातपात घडविण्याच्या उद्देशाने मागील २ दिवसापासून काही नक्षलवादी एकत्र येऊन कट रचत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली. त्यांनी महाराष्ट्रातील गडचिरोली व छत्तीसगड राज्यातील नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात सी ६० पार्ट्याच्या तब्बल २२ तुकड्या व सीआरपीएफच्या क्यूएटीच्या २ तुकड्या रवाना केले आणि दोन वेगवेगळ््या ठिकाणी माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. यावेळी माओवाद्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

त्यावेळी गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिस पथकाला दोन्ही वेगवेगळ््या ठिकाणी गोळीबार करावा लागला. या कारवाईत ५ नक्षलवाद्यांना कंठस्रान घालण्यात गडचिरोली पोलिस दलास यश प्राप्त झाले. सदर जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असून ५ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहे. मृत माओवाद्यांची त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नक्षलविरोधी मोहीम जोरात
छत्तीसगड राज्यात पोलिसांचा वाढता दबाव पाहून महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात नक्षली पलायन करणार या उद्देशाने दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलिस नक्षलविरोधी मोहीम राबवित आहेत. अशात छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात चकमक उडाली. त्यात तब्बल ५ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR