22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रमे महिन्यात वाघनखे महाराष्ट्रात होणार दाखल

मे महिन्यात वाघनखे महाराष्ट्रात होणार दाखल

- मुनगंटीवारांकडून नवीन तारीख - लंडनमधील प्रक्रिया पूर्ण

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त, लंडनमधील त्यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सुरू असलेली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करून मे महिन्यात ४ किंवा ५ तारखेला ही वाघनखे महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, यात प्रामुख्याने राज्यभरातील शिवपुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाच्या ३५० वर्षपूर्तीनिमित्त लंडनच्या म्युझियममध्ये असलेली त्यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची घोषणा शिंदे सरकारतर्फे करण्यात आली होती. त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षी लंडनला जाऊन व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियमसोबत करारही केला.

ही वाघनखे भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नववर्षात ती भारतात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर, या संदर्भातील जवळपास सर्व कायदेशीर आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता ४ ते ५ मे रोजी ही वाघनखे भारतात दाखल होणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR