आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका

हिंगोली : प्रतिनिधी
इस्रायल-इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागली आहे. घरगुती सिलिंडरच्या किंमती वाढल्या असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर इंधनाची देखील मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरदार हल्लाबोल केलाय. ‘देशाच्या परिस्थितीकडे पाहता आता ‘नरेंद्र सरेंडर’ म्हणण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
शेतमालाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी कळमनुरी ते हिंगोली दरम्यान आयोजित पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पदयात्रेद्वारे शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे शेती व्यवसायाची पीछे हाट होतानाचे चित्र आहे. इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय धोरण ठीक नसल्याने इंधनासारख्या समस्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. केंद्र सरकार योग्य पद्धतीने काम करत नसल्याने हा आक्रोश आहे. सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत. ‘नरेंदर सरेंडर’ म्हणण्याची वेळ आलेली आहे, याबद्दल मी दु:ख व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

संसदेत चर्चेला वाव दिला जात नाही
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामकाजावरही टीका केली. संसदेत सत्ताधा-यांना प्रोत्साहन दिले जाते, तर विरोधकांना बोलू दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला. ‘ संसदेत चर्चेला वाव दिला जात नाही. पार्लमेंटरी शब्द उच्चारण्यावरही मर्यादा आणल्या जात आहेत. लोकशाहीला मर्यादित करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असेही ते म्हणाले.

भारतीय टीमचे अभिनंदन
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, सर्व भारतीय टीमचे अभिनंदन. यापूर्वीसुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने वर्ल्ड कप आणला होता. याही टीमचं मी अभिनंदन करतो. आगामी काळामध्ये क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्ल्ड कप आपल्याला आणायचा आहे. फार आशादायी चित्र विजयामुळे निर्माण झाले आहे, असे त्यांनी म्हटले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news