19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही  : राहुल नार्वेकर

विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही  : राहुल नार्वेकर

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. सरकार पडायचे असते तर सभागृहातील संख्याबळावर पडले असते, त्यामुळे उगाचच कुणीतरी सरकार पडणार अशी भाषा करू नये,असा टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खासदार संजय राऊतांना लगावला आहे. आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार असून विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही, असे देखील राहुल नार्वेकर म्हणाले.

सरकार पडायचे असेल तर ते सभागृहातील संख्याबळावर पडत असते. सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असेल तर ते सरकार पडते. बाहेर कोण बोलतो म्हणून सरकार पडत नाही. या सरकारने बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे आणि तेवढी संख्या असल्याने त्यांनी बहुमताची अग्निपरीक्षा पास केली आहे. उगाचच कोणीतरी असंवैधानिकपणे सरकार पडणार पडणार अशी भाषा वापरू नये, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
आमदार अपात्रत्रेबाबत वेळेतच निर्णय होणार आहे असे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, सुप्रीम कोर्टाने जो टाईम बाँड दिला आहे. त्यानुसार वेळेत निर्णय द्यायचा माझा विचार आहे. पण कोणत्याही नैसर्गिक न्याय तत्त्वाला धक्का पोहचणार नाही. आमदार अपात्रतेबाबत योग्य वेळेत निर्णय घेणार आहे, असे नार्वेकर म्हणाले.

आदित्य ठाकरेंना टोला
पक्षांतर बंदी कायद्यचे उल्लंघने झाले आहे की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घ्यायचा नाही. निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. जर या कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर निश्चितच सक्षम विधानसभा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेईन. महाराष्ट्रातील जनतेला मी आश्वासीत करतो की कुठल्या प्रकारचा चुकीचा निर्णय दिला जाणार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य करत आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

स्थानिक स्वराज्य निवडणुका लांबणीवर
स्थानिक स्वराज्य निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सरकारने या निवडणुका लवकर व्हाव्यात असे आपले म्हणणे दिले आहे. परंतु याचा निकाल न लागल्यामुळे या निवडणुका घेता येत नाहीत, असे नार्वेकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR