23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeराष्ट्रीयबंगालमधील पोटनिवडणुकांसाठी टीएमसीने उमेदवार केले जाहीर

बंगालमधील पोटनिवडणुकांसाठी टीएमसीने उमेदवार केले जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) राज्यातील पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तृणमूल काँग्रेसने रायगंज विधानसभेसाठी कृष्णा कल्याणी यांना उमेदवारी दिली आहे. राणाघाट-दक्षिण मतदारसंघातून मुकुटमणी अधिकारी, माणिकतला मतदारसंघातून सुप्ती पांडे आणि बागडा मतदारसंघातून मधुपर्णा ठाकूर यांना तिकिट देण्यात आले आहे.

रायगंज आणि राणाघाट-दक्षिण (एससी) विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने त्याच दोन उमेदवारांना उभे केले आहे ज्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला होता. कृष्णा कल्याणी रायगंजमधून तर मुकुटमणी अधिकारी राणाघाट-दक्षिण (एसी) मधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. माणिकतळा आणि बागडा येथून उमेदवार बदलण्यात आले आहेत. सुप्ती पांडे यांना माणिकतलामधून तर मधुपर्णा ठाकूर यांना बागडामधून रिंगणात उतरवण्यात आले आहे.

१० जून रोजी भारतीय निवडणूक आयोगाने ७ राज्यांमधील १३ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. निवडणूक आयोगाने बिहारमधील एक, पश्चिम बंगालमधील ४, तामिळनाडू, पंजाब आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी एक, उत्तराखंडमधील २ आणि हिमाचल प्रदेशमधील ३ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक जाहीर केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR