23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाअफगाणिस्तान पोहोचला टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ मध्ये

अफगाणिस्तान पोहोचला टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ मध्ये

नवी दिल्ली : अफगाणिस्तानने ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर पापुआ न्यू गिनीचा सात गडी राखून पराभव करून टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे.

अफगाणिस्तानचा हा विजय न्यूझिलंडसाठी मोठा धक्का आहे. या पराभवामुळे सुपर-८ मध्ये पोहोचण्याच्या किवी संघाच्या आशा मावळल्या असून, न्यूझिलंड क गटात शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे.

अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने गटातील तिन्ही सामने जिंकले आहेत. तर न्यूझिलंडला सलग पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे न्यूझिलंड संघ स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पापुआ न्यू गिनी १९.५ षटकात ९५ धावांवर सर्वबाद झाला ज्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज किपलिन डोरिगा याने सर्वाधिक २७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुलबदिनच्या ४९ धावांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने १५.१ षटकांत ३ गडी गमावून ९६ धावांचे लक्ष्य गाठले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR